तरुणांच्या हातातील केळी खाण्याचा मोह हत्ती लाही आवरला नाही, पहा व्हिडिओ

पोलिसनामा ऑनलाईन – हत्ती (Elephant) च्या पिल्लाचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रस्त्यावरून डुलत फेरफटका मारत असताना अचानक हत्तीला समोर दोघेजण केळ (Banana) खाताना दिसले. त्यामुळे मोह न आवरल्याने हत्ती ने त्यांच्या हातातील केळ हिसकावून सोंडत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दोन तरुण केळी सोलून खाण्यासाठी तयार होते. मात्र समोरून येणारा हत्ती त्यांच्या हातातील सोलेले हे केळ हिसकावून गट्टम करत आहे. पुढे हत्ती दुसर्‍या व्यक्तीच्या केळही स्वत:च खाऊन टाकतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. आपल्याच धुंदीत असणार्‍या हत्तीला केळी पाहून मात्र मोठा आनंद झाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

वनअधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया (Social media ) वर शेअर केला आहे. हा हत्ती केळी खाण्यासाठी इतका भुकेलेला आहे की त्याने सालेही सोडले नाही. खाली पडलेला केळ्याचा तुकडाही वाया जाऊ न देता उचलून खाऊन निघून गेला हे दोन तरुण मात्र त्याच्याकडे पाहात राहिले.