प्रियंका गांधींचा पायगुण ; १० लाख कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश 

लखनौ : वृत्तसंस्था – प्रियंका गांधींचे राजकारणातील सक्रिय पाऊल काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर फायदा करत असल्याचे दिसत आहेत. प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्यापासून तब्बल १० लाख कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व नोंदवले आहे. प्रियंका गांधींकडे काही दिवसांपूर्वीच पूर्व उत्तर प्रदेशची धुरा सोपवण्यात आली होती.

आगामी लोकसभा – विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. दरम्यान सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी यांनी राजकारणात सक्रिय प्रदार्पण केली. दरम्यान काही दिवसांपूर्वीच त्यांच्याकडे पूर्व उत्तर प्रदेशची धुरा सोपवण्यात आली होती.याचदरम्यान, केवळ पूर्व उत्तरप्रदेशातच नव्हे तर, संपूर्ण देशात कार्यकर्त्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात तर कार्यकर्त्यांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. येथील काँग्रेस कार्यकर्त्यांची संख्या दीड लाखावरून साडेतीन लाखांवर गेली आहे.

इतकेच नव्हे तर, काँग्रेसमध्ये बुथ स्तरावर तब्बल १० लाख नवीन कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व नोंदवले आहे. उत्तर प्रदेश, तामिळनाडू काँग्रेसचा बालेकिल्ला नसतानाही तब्बल २५०००० नवीन बूथ कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या चार आठवड्यांत काँग्रेसला सर्वाधिक फायदा झाला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या देशभरातील कार्यकर्त्यांची संख्या ५.४ कोटीवरून ६.४ कोटींपर्यंत पोहोचली आहे.

विशेष म्हणजे, प्रियंका गांधींनी आतापर्यंत एकही सभा किंवा मेळावा घेतला नाहीये. १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर प्रियंका गांधींनी सर्व सभा स्थगित केल्या होत्या. प्रियंका गांधी केवळ लखनौ मध्ये नुकताच स्थापित केलेले कॉल सेंटरच्या माध्यमातून जनतेचे आणि कार्यकर्त्यांच्या प्रश्नाचे निरसन करत असतात.