Coronavirus Impact : एकाच तासात बुडाले 10 लाख कोटी रूपये, गुंतवणूकदारांचं ‘कोरोना’नं कंबरडचं मोडलं

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोनाचा परिणाम सोमवारी शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांवर झाला. शेअर बाजाराच्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांना पहिल्या तासात 10 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला. त्यात कोरोनामुळे सोमवारी संपूर्ण आशियाई बाजार पाण्यात बुडाला आहे. सोमवारी रात्री दहा नंतर सेन्सेक्स 10 टक्क्यांनी घसरुन म्हणजे 2991 अंकांनी घसरून 26,924 वर पोचला, त्यांनतर एनएसई आणि बीएसई या दोन्ही क्षेत्रातील व्यापार बंद झाला. लोअर सर्किट बसविण्यात आले आणि 1 तास व्यापार थांबविला गेला .

भारतीय शेअर बाजारामध्ये सकाळी 10 च्या सुमारास लोअर सर्किट सुरू होण्यापूर्वी बीएसई वर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 10,29,847 कोटी रुपयांनी घसरून 1,05,79,296 कोटी रुपयांवर गेले. म्हणजेच व्यवसायाच्या पहिल्या एका तासामध्ये सुमारे दहा लाख कोटी रुपयांचे गुंतवणूकदार बुडाले.

शेअर्स 20 टक्क्यांपर्यंत खाली
बीएसई सेन्सेक्सच्या सर्व 30 शेअर्समध्ये विक्री दिसून आली आणि अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स यांचे शेअर्स सुमारे 20 टक्क्यांनी खाली आले. सर्व क्षेत्राचे निर्देशांक लाल रंगाने दिसून येत आहेत आणि ही घसरण बँक, रिअल्टी आणि फायनान्स क्षेत्रांतून सुरू आहे. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येदेखील सुमारे 12 टक्क्यांनी आणि टीसीएसत 6 टक्क्यांनी घट झाली आहे.

जगभरात खळबळ :
जगात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेअर बाजाराचे सेंटीमेंट अत्यंत नकारात्मक आहे आणि जोरदार विक्री दिसून येत आहे. कोरोनाच्या कहरानंतर सोमवारी संपूर्ण आशियाई शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. जगातील बर्‍याच देशांनी दिलेल्या राहत पॅकेजमुळे बाजारांना कोणताही आधार मिळाला नाही. गुंतवणूकदारांच्या नकारात्मक मनोवृत्तीवर या गोष्टीचा अधिक प्रभाव पडला कारण अमेरिकन खासदारांमध्ये एक ट्रिलियन डॉलरच्या आपत्कालीन आर्थिक पॅकेजवर एकमत झाले नाही.

महत्त्वाचे म्हणजे जगभरात कोरोनामुळे मृत्यूची संख्या 14 हजारांच्या पुढे गेली आहे. सुमारे 1 अब्ज लोक घरांमध्ये बंधिस्त आहेत आणि डझनभर देशांमध्ये व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे, ज्यामुळे मंदी होण्याची शक्यता आहे.