बलात्कार करून विद्यार्थिनीला गरोदर करणाऱ्या शिक्षकाला १० वर्षांचा कारावास

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – नेरुळमधील महात्मा गांधी मिशन शाळा या प्रसिद्ध शाळेत २०१६ मध्ये धक्कादायक प्रकार समोर आला होता. या शाळेत शिकणाऱ्या सातवीच्या विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्या अत्याचारात ती मुलगी गरोदर झाली होती. तिच्यावर अत्याचार करणारा आरोपी हरिशंकर अवध बिहारी शुक्ला याला अखेर शिक्षा झाली आहे. ठाणे जिल्हा न्यायालयाने त्याला आज १० वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

नेरुळच्या सेक्टर-८ मध्ये असलेल्या एमजीएम शाळेत इंग्रजी माध्यमात सातवी इयत्तेत ही मुलगी शिकत होती. या १३ वर्षिय विद्यार्थीनीवर या शिक्षकाने म्हणेज हरिशंतर शुक्ला याने बलात्कार केला होता. यात ती मुलगी गर्भवती झाली होती. हे लक्षात आल्यावर मुलीच्या पालकांनी शाळा व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती. मात्र तेव्हा मुख्याध्यापिका सवा गुलाटी यांनी मुलीच्या पालकांना दमदाटी करत गप्प करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात पालकांनी नेरुळ पोलीसांत तक्रार दाखल केली होती.

शुक्ला याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले होते. तिनेही कोणाला सांगितले नाही. मात्र मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. शुक्ला याने सुरुवातीला आपण असे काही केले नसल्याचा आव आणला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यावर लगेच तेथून पळ काढला होता.

दरम्यान, आरोपी हरिशंकर शुक्ला हा दिल्लीत पोलीसांना समजताच त्यांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले होते. त्याच्यावरिल सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत आणि त्याला शिक्षाही करण्यात आली आहे.

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

You might also like