काय सांगता ! होय, 103 व्या वर्षी 14 हजार फूट उंचीवरून उडी

पोलीसनामा ऑनलाइन – इच्छाशक्ती तीव्र असेल, तर जगातल्या पाठीवरची कोणतीही गोष्ट माणसाला अशक्य नाही. एखादा लंगडा माणूस पळू शकतो असे म्हटले जाते ते काही खोटे नाही. ज्या वयामध्ये लोकांना धड दिसत नाही, ऐकू येत नाही, चालता येत नाही अशा वयामध्ये एका 104 वर्षांच्या आजोबांनी पॅराग्लायडिंग, स्काय डायव्हिंग असे धाडसी प्रकार करून इच्छेपुढे वय कधीच आडवे येऊ शकत नाही हे दाखवून दिले आहे.. तरुणांनाही त्याची भीती वाटेल अशी गोष्ट या एकशे चार वर्षांच्या तरुण माणसाने शक्य करून दाखवली. त्यांचा विक्रम पाहून लोक थक्क झाले आहेत.

103 वय असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने 14 हजार फूट उंचीवरून खाली उडी मारली. अल्फ्रेड अल बलास्के (Alfred “Al” Blaschke) असे या वृद्धाचे नाव असून, त्याने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवण्याचा विक्रम केला आहे.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेच त्यांच्या या उच्चांकाचा एक व्हिडिओ ट्विट केला असून, तो पाहून कोणीही ही आपली बोटे तोंडात घालेल. या व्हिडिओमध्ये टैंडम पैराशूट जंप प्रकारात एकशे तीन वर्षे वयाच्या ज्येष्ठाने आकाशातून पॅराशूट जंप करत खाली उडी घेतली. या ज्येष्ठाने टँडम पॅराशूट जंप प्रकारामध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे.

अल्फ्रेड यांचा उच्चांक पाहण्यासाठी त्यांचा संपूर्ण परिवार मीडिया आणि हौशी लोक एकत्र झाले होते. अल्फ्रेड यांनी ताशी 120 किलोमीटर वेगाने 14000 फुटांवरून उडी घेतली.

या दरम्यान त्यांच्यासोबत मार्गदर्शकसुद्धा होते. ही उडी पूर्ण करण्यासाठी त्यांना पाच मिनिटांचा वेळ लागला. यापूर्वी शंभर वर्षे वय असताना त्यांनी पॅराग्लायडिंग केले होते. त्यांनी शंभराव्या वाढदिवसानिमित्त स्काय डाइविंग करताना ही प्रतिज्ञा केली होती की, एक दिवस असाच उंचावरून उडी मारण्याचा उच्चांक पुन्हा एकदा दाखवून देईन. त्यांनी स्वतःची प्रतिज्ञा पूर्ण केली. ज्यावेळी आपली नातवंडे पदवीधर होतील. त्यावेळी आपण पॅराग्लायडिंग करू, असे त्यांनी म्हटले होते.

सोशल मीडियावर त्यांच्या उच्चांकाचा व्हिडिओ नुकताच शेअर करण्यात आला आहे. या पोस्टवर लोकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोक त्यांचे अभिनंदन करत असून, या वयातही कौतुक करीत आहेत.