Coronavirus : चीननंतर इटलीमध्ये ‘कोरोना’चा ‘हाहाकार’, आतापर्यंत 107 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे नागरिक मृत्युमुखी पडत असतानाच आता इटली मध्ये सुद्धा मृत पावणाऱ्या लोकांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. त्याच बरोबर संसर्ग झालेल्या लोकांची संख्या ही तीस हजारांपेक्षा जास्त आहे. मागच्या २४ तासांत अजून २८ नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे ही संख्या १०७ वर पोहोचली आहे. चीननंतर इटलीमध्ये कोरोनाचे सर्वाधिक बळी गेले आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये आतापर्यंत ३,०८९ रुग्णांना संसर्ग झाल्याची नोंद झाली आहे.

शाळा, विद्यापीठ १५ मार्चपर्यंत बंद
इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा १०७ वर पोहोचला असून, शाळा आणि विद्यापीठे १५ मार्च पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. कोरोना विषाणूचा ३००० हजार लोकांना संसर्ग झाला आहे.

चीनमध्ये २,९८१ लोकांचा मृत्यू
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रभाव अत्यंत झपाट्याने वाढत आहे. बुधवारी चीनमध्ये ११९ नवीन लोकांना याची लागण झाल्याची नोंद झाली आहे. त्यातील ५ नागरिक हे वुहान प्रांतातील आहेत. चीनमध्ये ८०,२७० लोकांना कोरोनाची लागण झाली असून,२,९८१ लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआ ने सांगितले की, या संसर्गानंतर तयार केलेली हुबेई प्रांतातील रुग्णालये बंद होण्याची शक्यता आहे, कारण या रुग्णालयांत अनेक जागा रिकाम्याच पडून आहेत.

भारतात १६ इटालियन नागरिकांना झाली लागण
चीनमध्ये सुरु झालेल्या कोरोना व्हायरसने आता आपले पाय भारतात देखील पसरवण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी मिळालेल्या माहितीनुसार, भारतात २९ लोकांना कोरोना ची लागण झाली आहे. त्यामध्ये १६ इटालियन नागरिक असून, त्यांची योग्य ती तपासणी केली जाणार आहे. कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेता परदेशांतून भारतात येणाऱ्या सर्व नागरिकांचे स्क्रीनिंग विमानतळावर केले जाणार आहे, आतापर्यंत केवळ कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या क्षेत्रातील १२ देशांमधून भारतात येणार्‍या प्रवाशांची तपासणी केली जात होती.

पेटीएम च्या कमर्चाऱ्यांना देखील झाली लागण
दरम्यान, तपासणी दरम्यान गुडगावमधील पेटीएम कर्मचाऱ्याला कोरोना विषाणूची लागण झाली असल्याचे समोर आले. कंपनीने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हा कर्मचारी नुकताच सुट्टीच्या दिवशी इटलीहून परतला होता, कोरोना विषाणूमुळे सर्वाधिक पीडित देशांपैकी इटली हा एक देश आहे. परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, परदेशात १७ भारतीयांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यापैकी १६ प्रकरणे जपानमधील क्रूझ जहाजातून, तर संयुक्त अरब अमिरातीमधील एका नागरिकाचा समावेश आहे.