वडील रागवल्याने बारा वर्षाच्या मुलाची आत्महत्या

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – भोसरी, कासारवाडी येथे वडील रागवल्याने नेराश्यातून १२ वर्षाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पैश्यावरुन वाद झाल्याने मुलाने हे कृत्य केले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला.

यश मुळीक (१२, कासारवाडी) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश याच्या आईचे देहांत झाले आहे. त्यामुळे यश आणि त्याचे वडील कासारवाडी येथे एका खोलीत भाड्याने राहत होते. बाहेरून जेवणाचा डब्बा आणून खात होते. वडील कंपनीत कामाला आहेत. यश याने शाळा सोडली होती, तो तेथील मुलांसोबत दिवसभर खेळत असे.

यशला वडील खर्च करण्यासाठी पैसे (पॉकेट मनी) देत होते. मंगळवारी याच पैश्यावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. त्यानंतर वडील कामासाठी बाहेर निघून गेले. दरम्यान घरी एकटा असताना यश याने आत्महत्या केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.