संतापजनक : 14 वर्षांच्या मुलीवर वृद्धासह युवकाचा अत्याचार, पीडितेस गर्भधारणा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा तालुक्यातील एका गरीब कुटुंबातील 14 वर्षीय मुलीवर परिसरातील एक युवक व 65 वर्षांच्या वृद्धाने जबरी अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेतून पीडित मुलीस गर्भधारणा झाल्याचेसमोर आले आहे. याप्रकरणी बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर 65 वर्ष वृद्धास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भानुदास गंगाराम भिसे (वय 30) व नामदेव बांबू आढागळे (वय 65) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ‘तू मला फार आवडतेस. माझे तुझ्यावर प्रेम करीत आहे’, असे सांगून भानुदास गंगाराम भिसे याने वेळोवेळी पीडित मुलीवर गेल्या ५ महिन्यांपासून अत्याचार केला. दरम्यानच्या काळात शेजारी राहत असणारा नामदेव अंबू अढागळे (वय 65) यला समजले. एक दिवस घरी कुणी नसताना तो घरी येऊन पीडितेला म्हणाला की, ‘तू माझे ऐकले नाहीतर व मला शरीरसुख दिले नाही, तर मी तुझ्या आई-वडिलांना व नातेवाईकांना ही गोष्ट सांगेन’, अशी धमकी दिली.

त्या वृद्धाने देखील पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला. सदर पीडित मुलीच्या पोटात काही दिवसांपासून दुखू लागल्याने तिच्या आईने तिला प्रथम श्रीगोंदा कारखाना येथे खाजगी दवाखान्यात नेले असता सदर डॉक्टरांनी त्यांना सोनोग्राफी करण्यास सांगितले. सदर मुलीच्या आईने काष्टी येथील एका खाजगी दवाखान्यात तपासणी करता नेले असता सदर मुलगी तीन ते चार महिन्यांची गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी तिच्या आईस सांगितले. यानंतर सदर मुलीस विश्वासात घेऊन तिच्या आईने विश्वासात घेत याबाबत विचारले असता तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती आईस सांगितले. यावरून पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like