‘हैवान’ बनलेल्या शेजार्‍यानं 16 वर्षाच्या मुलीवर केला ‘अत्याचार’, बलात्कारानंतर तिला ‘पेटवून’ दिलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महिलांबरोबर घडणाऱ्या बलात्काराच्या आणि अत्याचाराच्या घटना थांबताना दिसत नाहीत. नुकतीच एक धक्कादायक, मन हेलावून टाकणारी घटना उत्तरप्रदेशच्या संभळ जिल्ह्यात घडली. जेथे 16 वर्षाच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच बलात्कार केला. एवढेच करुन हा नराधम थांबला नाही. त्याने मुलीला रॉकेल अंगावर टाकून पेटवून दिले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ही धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत मुलगी गंभीर स्वरुपात भाजली आहे. तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अधिकारी आलोक जयस्वाल यांनी सांगितले की शुक्रवारी नखासा पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राहणारी मुलगी घरी एकटी होती. या दरम्यान तिच्या शेजारच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की आरोपीने बलात्कार करुन मुलीवर रॉकेल टाकून पेटवून दिले.

पेटवून दिल्याने पीडित मुलगी मोठ्या प्रमाणात भाजली आहे, आता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी एफआयआर दाखल केली आहे. यानंतर या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Visit : Policenama.com