17 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन (कल्याण साबळे पाटील) – लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत पेरणे फाटा येथील भीमा नदीत दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. दुपारी सापडलेल्या मृतदेहामुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबतीत लोणिकंद पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेणुका सोमनाथ डाकरे (वय : १७वर्षे ) असे भीमा नदीत सापडलेल्या मुलीचे नाव असून या बाबतीत 20 डिसेंबर रोजी लोणीकंद पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाने कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेल्या प्रकरणी गुन्हा दाखल होता.

पेरणे फाटा येथील भीमा नदीत दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय तरुणीचा मृत देह आढळल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली. मात्र या मुलीने आत्महत्या केली आहे की कोणी घातपात केला आहे याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/