एक नव्हे तर दोन हवाई हल्ल्यांमध्ये पर्रिकरांची महत्त्वपूर्ण भूमिका – राजनाथ सिंह

पणजी : वृत्तसंस्था – माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकरांची एक नव्हे तर दोन हवाई हल्ल्यांमध्ये महत्वपूर्ण भूमिका होती, असे केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हटले आहे. त्यामुळे नेमके पाकीस्तानात घुसून नेमके किती हवाई हल्ले करण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

माजी संरक्षण मंत्री व गोव्यांचं मुख्यमंत्रिपद दिवंगत मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित सभेत राजनाथ यांनी हे विधान केले आहे.

 

राजनाथ सिंह म्हणाले की, उरीतील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी तातडीने बैठक बोलावली. त्या बैठकीमध्ये पर्रिकर यांच्या चेहऱ्यावर या हल्ल्याबद्दलचा राग स्पष्टपणे दिसत होता. त्यानंतर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात पर्रिकर यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. ते ऑपरेशन पूर्ण होईपर्यंत त्यावर करडी नजर ठेवून होते, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

तसेच कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण, एक नव्हे तर दोन हवाई हल्ल्यांमध्ये पर्रिकर यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.