टेम्पो-ट्रकची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

नागज (सांगली) : पोलीसनामा ऑनलाईन

वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव टेम्पोची धडक समोरुन येणाऱ्या ट्रकला बसली. समोरासमोर झालेल्या या भीषण अपघातात नरसिंहगावातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवार) सकाळी मिरज-पंढरपूर रस्त्यावर नागज येथे झाला.
रविंद्र तुकाराम मोहिते (वय ४०) व हणमंत सर्जेराव कदम (वय ३२) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’de005fa3-cca0-11e8-8476-51829a372b34′]

रविंद्र आणि हणमंत हे दोघेजण टेम्पोने वाळू घेऊन सांगोल्याहून कवठेमहांकाळच्या दिशेने निघाले होते. नागज फाट्याजवळ सांगलीतून सोलापूरला निघालेल्या ट्रकला (आरजे १४ जीजी १४७७) समोरून भरधाव येणार्‍या टेम्पोने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की टेंम्पोच्या पुढचा भाग ट्रकमध्ये घुसला. दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. त्यामुळे मृतदेह टेम्पोच्या सांगाड्यात अडकले होते. नागजचे माजी उपसरपंच तानाजी शिंदे यांनी या घटनेची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना दिली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन व्हसमाळे यांच्यासह कवठेमहांकाळ पोलिसांनी पंचनामा केला. या घटनेची नोंद कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e7652877-cca0-11e8-813e-8f6a359c2248′]

मदत करणार्‍यांना धक्काबुक्की, शिवीगाळ
अपघातातानंतर नरसिंहपूर येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्याआधी नागजसह परिसरातील ग्रामस्थ टेम्पोमधील अडकलेल्या एकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावेळी मदत करणार्‍यांनाच धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली. अपघाताची छायाचित्रे घेणार्‍या पत्रकारांनाही पोलिसांसमोरच दमबाजी आणि धक्काबुक्की करण्यात आली.
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ed3383dd-cca0-11e8-a4d4-d3c4cde2a13a’]

राजरोसपणे वाळू चोरी सुरू
कवठेमहांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी वाळूचोरीवर लगाम घातला आहे. पण गेल्या अनेक महिन्यापासून टेम्पो व पिकअपमधून राजरोसपणे वाळूचोरी सुरू आहे. सुमारे पंधरा ते वीस टेम्पोमधून रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक केली जात असल्याची चर्चा आहे. ही वाहने भरधाव वेगाने जातात.