पुण्यात मोटारीत आढळले २ पिस्तूल, ५ जिवंत काडतुसे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी केली जात आहे. दिघीतील मॅक्झिन चौकात बुधवारी वाहन तपासणीत एका मोटारीत दोन पिस्तूल व पाच जिवंत काडतुसे आढळून आली. भरारी पथकाने ती जप्त केली आहे.

या मोटारीतील पाच जणांना दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भोसरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक विभागातील भरारी पथकाचे प्रमुख राजदीप तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र टिके, भाऊसाहेब पाटील, आनंद कापुरे, सुभाष डमाळ, दिलीप खंदारे, पोलीस नाईक दिपाली सुरकुले यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
यापूर्वीही या परिसरात मोटारीतून आणण्यात येत असलेली मोठी रोकड जप्त करण्यात आली होती.

Loading...
You might also like