जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेले आरोपी गुन्हे शाखेकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देहूरोड येथे एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकऱणी पाहिजे असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या यूनीट १ च्या पथकाने अटक केली आहे. त्या दोघांना देहूरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

विजय लक्ष्मण शिंदे (वय १९ वर्ष रा.वाघोली गावठाण) अमोल रमेश गालफाडे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हात पोलिसांना पाहिजे असलेले दोघे पुण्यात आहेत अशी  माहिती गुन्हे शाखेच्या युनीट १ चे पोलीस नाईक सचिन जाधव यांना मिळाली. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून त्यांनी विजय लक्ष्मण शिंदे, अमोल रमेश गालफाडे या दोघांना अटक केली. त्यानंतर त्या दोघांना देहूरोड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे