2000 Note Ban | ‘नोट बंदीमुळे ज्यांची अडचण होणार आहे, तेच आरडाओरड करत आहेत’, भाजपचा विरोधकांवर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आरबीआयने (RBI) चलनातील दोन हजार रुपयांच्या नोटा रद्द (2000 Note Ban) करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी आरबीआयने 30 सप्टेंबर पर्यंतची मुदत दिली आहे. आरबीआयच्या या निर्णयावरून विरोधकांनी केंद्र सरकार (Central Government) आणि आरबीआय वर टीका केली आहे. विरोधकांच्या टीकेला भाजपचे (BJP) प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. नोट बंदीच्या (2000 Note Ban) निर्णयामुळे सर्वसामान्यांची गैरसोय होणार नाही तर ज्यांना नोटा बँकेत जमा करताना अडचण होणार आहे, तेच आरडाओरडा करत असल्याची टीका भंडारी यांनी केली.

माधव भांडारी म्हणाले, दोन हजारांची नोट रद्द (2000 Note Ban) करण्यात आलेली नाही. तात्पुरती व्यवस्था म्हणून या नोटेचा वापर सुरु करण्यात आला होता. या नोटा मागे घेतलेल्या नाहीत. नोटा बदलून घेण्याची मुदत संपल्यानंतरही या नोटा हिशोब देऊन बदलता येणार आहेत. या संपूर्ण निर्णय प्रक्रियेत सामान्य माणसाचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही , मात्र काही मंडळी केवळ व्यक्तिगत कारणांसाठी या निर्णयाबद्दल गैरसमज पसरवत असल्याचा आरोप भंडारी यांनी केला.

सामान्यांकडून रोखीचे व्यवहार कमी झाले

डिजिटल प्रक्रियेमुळे एकूणच सामान्य माणसाचे रोखीचे व्यवहार कमी झाले आहेत. सामान्य माणसाकडून दोन हजाराच्या नोटा वापरण्याचे प्रमाण कमी आहे. दररोज प्रति व्यक्ती 10 नोटा बदलून घेता येऊ शकतात. सामान्य माणसाकडील या नोटांचे प्रमाण लक्षात घेता तो आरबीआयने दिलेल्या वेळेत नोटा बदलून घेऊ शकतो, असेही भंडारी यांनी सांगितले.

तीच मंडळी कावकाव करत आहेत

आरबीआयच्या निर्णयामुळे सामान्य माणसाचे कोणत्याही पद्धतीचे नुकसान होणार नाही.
ज्या लोकांना या निर्णयामुळे आपले नुकसान होण्याची भीती वाटते आहे , तीच मंडळी याविरुद्ध कावकाव करीत आहेत.
निर्धारित मुदतीनंतरही नोटा बदलून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
मात्र त्यासाठी या रकमेचा हिशोब द्यावा लागेल. हिशोब देणे ज्यांना गैरसोयीचे आहे,
तीच मंडळी याविरुद्ध आरडाओरड करीत आहेत, अशी टीका माधव भंडारी यांनी केली.

Web Title : 2000 Note Ban | bjp mumbai madhav bhandari slams oppositions mva shivsena ncp congress over 2000 rs notes decision y rbi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा
Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी-चिंचवड : चिखली चौकात भरदिवसा सोन्या तापकीरवर गोळीबार
Pune News | मेट्रो व ठेकेदाराच्या वादात पुणेकर त्रस्त, कर्वेनगर भागातील अर्धवट कामे पूर्ण करण्याची मागणी
NCP Chief Sharad Pawar | मविआमध्ये जागा वाटपाबाबत कोण निर्णय घेणार?, शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं