माजलगावमध्ये 22 लाखांचा गुटखा जप्त

बीड/माजलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर पोलिसांनी कारवाई करून 22 लाख 50 हजार रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 22 लाख 50 हजार रुपयाचा 30 पोती गुटखा, एक आयशर टेम्पो, महिंद्रा कंपनीचा जितो छोटा हात्ती असा एकूण 34 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

माजलागाव येथील मोंढा येथे एका खोलीत गुटखा साठवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मोंढा येथे छापा टाकला असता आयशर टेम्पो मधील गुटखा खोलीत उतरवून हा गुटखा छोटा हात्ती टेम्पोत भरत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने आरोपी रवि सक्राते हा तेथून पळून गेला. हा माल माजलगाव येथील अशोक सक्राते यांचा असल्याची माहित मिळाली आहे.

पोलिसांनी याबाबत अन्न व भेसळ अधिकाऱ्यांना कळवून गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई माजलगाव पोलीस उप अधीक्षक डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल शैलेश गडेवार, पोलीस नाईक रवी राठोड, खराडे यांच्या पथकाने केली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/