गोव्यात रेव्ह पार्टी ! 23 लोकांना अटक, परदेशींचा देखील सहभाग, 9 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त

पणजी : वृत्तसंस्था – गोव्यातील एका विलामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून 23 लोकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तीन परदेशी महिलांचा समावेश आहे. गोवा पोलिसांच्या क्राइम ब्रँचने रविवारी उत्तर गोव्यातील वागाटोरच्या एका विलामध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला. यासोबतच 9 लाख रूपयांचे ड्रग्जदेखील जप्त करण्यात आले. पोलिसांनी म्हटले की, या प्रकरणात 23 लोकांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये तीन परदेशी महिलांचा सुद्धा सहभाग आहे. यासोबतच सुमारे 9 लाख रूपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. एसपी (क्राइम ब्रँच) शोभीत सक्सेना यांच्यानुसार, कोविड-19 महामारीच्या दरम्यान सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षा अभियानांतर्गत ही छापेमारी करण्यात आली.

विलामध्ये सुरू होती पार्टी
ही पार्टी वागाटोर बीज व्हिलेज जवळील फ्रेंगिपॅनी नावाच्या एक विलामध्ये आयोजित करण्यात आली होती. एसपींनी सांगितले की, सखोल तपासणी केली असता कोकीन, एमडीआर, एक्सटेसीच्या गोळ्या आणि चरससारखे ड्रग्स मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 9 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

एफआयआर दाखल करून पुढील कारवाई सुरू
एसपींनी सांगितले की, लोकांची सुरक्षा धोक्यात टाकणे आणि अमली पदार्थांसाठी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे. गोवा पोलीसचे डीजीपी मुकेश मीणा यांच्या इशार्‍यानंतर काही दिवसात हा छापा मारण्यात आला. त्यांनी म्हटले होते की, महामारीच्या दम्यान गोव्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्ट्यांबाबत मला समजले आहे आणि त्यांनी याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची सूचना सुद्धा केली होती.