पुणे : कोथरुडमध्ये 24 पोते गुटखा पकडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्नाटक राज्यातून पुण्यात विक्रीसाठी आलेले 24 पोती गुटखा कोथरुड पोलिसांनी पकडला. पोलिसांनी अंदाजे साडेसहा लाख रुपये किंमतीचा गुटखा व ट्रक पकडून अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे.

ट्रकचालक षण्मुखाप्पा बसवराज यलीगार (वय 33, रा अरलीकट्टी ता. हुबळी, जि़ धारवाड, कर्नाटक) आणि कोथरूड येथील दुकानदार महेश जसराज भाटी (वय 22, रा. सुतारदरा, गल्ली क्र 10,शिवकल्याण नगर कोथरूड) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, कोथरुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील हे तपास पथकातील कर्मचाऱ्यांसह गस्त घालत होते. उजवी भुसारी कॉलनी येथे कर्नाटकातील एक ट्रक उभा होता. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची तपासणी केली. तेव्हा त्यात २४ पोती विमल गुटखा आढळून आला. त्यांनी एफडीएच्या अधिकाऱ्यांना याची माहिती दिली व आरोपी व ट्रकसह गुटखा एफडीएच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी, उपनिरीक्षक संतोष पाटील, पोलीस कर्मचारी संभाजी लोखंडे, युवराज काळे, नितीन कानवडे, मनोज पवार, महेंद्र उईके, भास्कर बुचडे यांच्या पथकाने केली आहे.

Visit : Policenama.com 

You might also like