PoK च्या ‘गिलगित-बाल्टिस्तान’मध्ये भीषण दुर्घटना, 26 जणांचा मृत्यू तर 12 जखमी

वृत्‍तसंस्था – PoKच्या गिलगित-बाल्टिस्तानमध्ये रविवारी एक भीषण दुर्घटना घडली आहे. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला आहे तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बाबूसर टॉपजवळ घडली आहे. गिलगित-बाल्टिस्तान सरकारचे प्रवक्‍ता फैजुल्‍लाह फरक यांनी दिलेल्या माहितीनुसार बस दुर्घटनेमध्ये महिलांसह लहान मुलांचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत.

ही घटना बाबूसर टॉपजवळील गेटी दास परिसरात झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, आत्तापर्यंत दुर्घटनेचे कोणतेही कारण समोर आलेले नाही. दर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यामध्ये जास्त करून गिलगित-बाल्टिस्तानच्या लोकांचा समावेश आहे.

अपघातानंतर जिल्हा रूग्णालयात जखमी झालेल्यांना दाखल करण्यात आले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. काही जखमींना खासगी रूग्णालयात देखील दाखल करण्यात आले आहे. डायमर पोलिसांच्या प्रवक्‍ते मोहम्मद वेकेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार हा अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर बस डोंगराला जाऊन धडकली. यात्रेकरूंसाठी नियमीतपणे वापरला जाणारा बाबूसर मार्ग हा दरवर्षी जूनपासुन ऑक्टोबर पर्यंत चालु असतो. बर्फाचा वर्षाव झाल्यानंतर बाबूसर मार्ग बंद करण्यात येतो.

Visit :- policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like