वाहतूक पोलिसांकडून रिक्षासांठी शहरात नवीन 28 थांबे…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने पुन्हा आदेश काढून काही ठिकाणच्या रिक्षा थांब्यात बदल केले आहेत. तर, काही ठिकाणी नवीन रिक्षा थांबे सुरू केले आहेत. शहरात असे 28 ठिकाणे निर्माण केली असून, त्याचाच वापर रिक्षा चालकांनी करायचा असल्याचे म्हटले आहे. या थांब्यावर किती रिक्षा थांबतील याची संख्याही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

वाहतूक विभाग व कक्षांत रिक्षा थांबा व संख्या

दत्तवाडी — (सनसिटी रोड,सिंहगड पोलीस स्टेशन रस्ता, खाडे वॉशिंग चौक येथे सिंहगड रोड– रिक्षा संख्या– 10)

दत्तवाडी — (शिवसृष्टी सोसायटीजवळ व अग्निशमनदल चौकाजवळ तेथून डावीकडील बाजुस सनसिटी रोड, सिंहगड रोड– रिक्षा संख्या– 5)

दत्तवाडी — (सन एम्पायर 5 सन ईलाईट सिंहगड रोड– रिक्षा संख्या–5)

दत्तवाडी — (सनसिटी फेज-2 बस स्टॉप सोडून सोसायटीच्या मध्यभागी सिंहगड रोड– रिक्षा संख्या–5)

दत्तवाडी — (नांदेड सिटी गेटपासून राजयोग सोसायटी चौकाकडे जाणार्‍या रोडवरती नांदेड सिटी गेटपासून 30 मिटर अंतरावर– रिक्षा संख्या 5)

हडपसर — (हडपसर रेल्वे स्टेशन समोर, शाहुनगर वसाहत लगत, उजव्या बाजुला भिंतीलगत– रिक्षा संख्या– 10)

हडपसर — (मु.पो. फुरसुंगी खडकेश्वर मंदिराजवळ– रिक्षा संख्या– 5)

हडपसर — (सासवड फुरसुंगी रोड, महावितरण कार्यालयाजवळ– रिक्षा संख्या–5)

हडपसर — (साईबाबा रिक्षा स्टॅन्ड सासवड फुरसुंगी रोड महावितरण कार्यालयाजवळ– रिक्षा संख्या 5)

वारजे — (यशश्री कॉलनी समोरील मुख्य पाणंद रस्ता, कर्वेनगर– रिक्षा संख्या 5)

वारजे — (गोल्डन पेटल्स समोरील मुख्य रस्ता, ट्री हाऊस स्कुलजवळ– रिक्षा संख्या 5)

येरवडा — (गल्ली नं. 8 कल्याणीनगर– रिक्षा संख्या–5)

येरवडा — (वल्लभ रिक्षा स्टॅड, गल्ली नं. 7, कल्याणीनगर– रिक्षा संख्या-5)

येरवडा — (गल्ली नं. 6 कल्याणीनगर– रिक्षा संख्या 5)

येरवडा — (कल्याणीनगर कॉर्नर– रिक्षा संख्या 5)

येरवडा — (कोनार्क स्लेंडर रिक्षा स्टॅन्ड वडगाव शेरी– रिक्षा संख्या- 5)

येरवडा — (शांतीनगर कॉर्नर रिक्षा स्टॅन्ड, विश्रांतवाडी– रिक्षा संख्या-5)

येरवडा — (सनशाईन रिक्षा स्टॅन्ड, कल्याणीनगर)

विमानतळ — (नवनाथ रिक्षा स्टॅन्ड विमाननगर– रिक्षा संख्या 5)

विमानतळ — (कोनार्क रिक्षा स्टॅन्ड विमानगर– रिक्षा संख्या 5)

विमानतळ — (धानोरी जकातनाका, लोहगाव रोड– रिक्षा संख्या 5)

विमानतळ — (सिंबायोसिस विमाननगर न्यु कॅम्पस विमाननगर समोरील रस्त्यालगत– रिक्षा संख्या 5)

विमानतळ — (सिंबायोसिस कॅम्पस गेट नं. 4, च्या बाजुला रस्त्याचे लगत विमाननगर– रिक्षा संख्या 5)

विमानतळ — (काळभैरवनाथ रिक्षा स्टॅन्ड, अशोक चौक खराडी बायपास चौक– रिक्षा संख्या 5)

भारती विद्यापीठ — (लेक टाऊन सोसायटी गेट नं. 2, भारती विद्यापीठ– रिक्षा संख्या 10)

भारती विद्यापीठ — (व्यंकटेश्वरा हाईट्जवळ भारती विद्यापीठ– रिक्षा संख्या 5)

भारती विद्यापीठ — (लेक टाऊन रिक्षा थांबा कात्रज– रिक्षा संख्या 5)

सहकारनगर — 666 चैत्रबन वसाहत समोर स्टेट बँक कॉलनी शेजारी बिबवेवाडी– रिक्षा संख्या 5)

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/