इमारतीच्या सेफ्टी टँकची साफ-सफाई करताना तिघांचा दुर्दैवी मृत्यू

वसई : पोलीसनामा ऑनलाइन – इमारतीच्या सेप्टी टँकची (टाकी) साफसफाई करताना तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. नालासोपारा पश्चिमेकडील निलमोरे येथील आनंद व्ह्यू या इमारतीत ही दुर्दैवी घटना घडली. सेफ्टी टँकची साफ सफाई करण्यासाठी एक कामगार आतमध्ये उतरला. काहीवेळात तो आतमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचवण्यासाठी दोन कामगार सेफ्टी टँकमध्ये उतरले. परंतु तिघांचाही आतमध्ये गुदमरून मृत्यू झाला.

निलमोरे येथील आनंद व्ह्यू या इमारतीमधील सेप्टी टँकची सफाई करण्यासाठी सहा कामगार काम करत होते. रात्री साडे बाराच्या सुमारास एक कामगार सेफ्टी टँकमध्ये उतरला. आत उतरल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागेल. त्यातच तो टाकीमध्ये बेशुद्ध पडला. तो बेशुद्ध पडल्याचे पाहून त्याला वाचवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले दोन कामगार टाकीत उतरले. त्यांनाही आतमध्ये गेल्यनंतर अस्वस्थ वाटू लागले. काही वेळात ते ही बेशुद्ध पडले. टाकितच तिघांचा गुदमरून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून टाकीतील कामगारांचे मृतदेह बाहेर काढले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी इमारतीच्या सुपरवायझरला ताब्यात घेतले आहे.