पोलिसनामा ऑनलाईन टीम – जम्मू-काश्मीरमधील कुलगाम भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. आतापर्यंत तीन दहशतदवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. तर, तीन जवान जखमी झाले असल्याची देखील माहिती मिळाली आहे. जम्मू-काश्मीर पोलीस व लष्करी जवानांचे संयुक्त पथकाकडून ही कारवाई केली जात आहे.
#UPDATE Another unidentified terrorist killed (total 3) in the encounter at Kulgam. Incriminating materials including arms & ammunition recovered. Search operation underway: Jammu & Kashmir Police
— ANI (@ANI) July 17, 2020
चकमकीत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणाहून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. कुलगाममधील नागनाद-चिम्मर परिसरात चमकीस सुरूवात झाली आहे. या परिसरास जवानांनी वेढा दिला असून, शोधमोहीम राबवली जात आहे. उत्तर काश्मीर जिल्ह्यातील कुपवाडामधील केरन सेक्टमध्ये काल घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत, जवानांनी एक दहशतवाद्याचा खात्मा केला होता.
या दहशतवाद्याकडून एक एके 47 रायफल हस्तगत करण्यात आली होती. परिसरात आणखी दहशतवादी असल्याचा संशय असल्याने जवानांकडून संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.