‘सोनभद्र’च्या खाणीत मिळालेलं ‘सोनं’ हे भारत सरकारच्या ‘तिजोरी’मध्ये असलेल्या सोन्यापेक्षा 5 पट जास्त, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक अशी वेळ होती जेव्हा भारताला संपत्तीचा देश म्हणून ओळखले जात होते, म्हणले जात असे की भारतातून सोन्याचा धूर निघतो. परंतु वेळ बदलत गेली, भारतावर अनेकांनी आक्रमण केली, राज्य केले, आणि सोनं लुटून नेले. मात्र सोनभद्र जिल्ह्यात मिळालेल्या तब्बल 12 लाख कोटी रुपयांच्या किंमतीचे 3,350 टन सोन्याने पुन्हा एकदा भारताची अपेक्षा वाढवली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते सध्या भारताकडे तब्बल 626 टन सोन्याचे भंडार आहे, तर सोनभद्र जिल्ह्यात मिळणारे सोने त्यापेक्षा 5 पट जास्त आहे. आता असे मानले जात आहे की सोन्याच्या साठ्यासाठी भारत जगातील टॉप – 10 मधील देश आहे.

भारतीय भू वैज्ञानिक सर्वेक्षणात या पर्वतीय प्रदेशात तीन हजार टन पेक्षा जास्त सोनं असल्याचा अंदाज उपस्थित केला गेला आहे. सर्वेक्षणात सोनाभद्रच्या पर्वतीय प्रदेशात सोन्याशिवाय, लोखंड आणि इतर खनिजे उपलब्ध आहेत. सध्याच्या सोन्याच्या तुलनेत या सोन्याचे मूल्य तब्बल 12 लाख कोटी रुपये आहे.

वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार, भारतासह जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी करत आहेत. अहवालानुसार लागोपाठ 10 व्या वर्षी मध्यवर्ती बँकांनी ही खरेदी केली आहे. 2019 साली जगभरातील 15 मध्यवर्ती बँकांनी 650.30 टन सोनं खरेदी केलं आहे. यापूर्वी 2018 मध्ये 656.2 टन सोनं खरेदी केले होते.

या अहवालानुसार, 2010 ते 2019 दरम्यान जगभरातील मध्यवर्ती बँकांत तब्बल 5,019 टन सोनं खरेदी करण्यात आली म्हणजे दरवर्षी 500 टन सोनं खरेदी केलं. यापूर्वी दशकभरात 443 टन सोनं खरेदी केले गेले आहे. जर सोप्या शब्दात सांगायचे दर वर्षाला 57 टन सोनं जास्त खरेदी केलं गेलं आहे.

जगातील सर्वात जास्त सोन्याचे भांडार अमेरिकेत असून 8,133 टन सोनं त्यात जमा आहे. जे त्यांच्या एकूण परदेशी चलनाच्या 76.9 टक्के आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे जर्मनी, जर्मनीकडे एकूण 3366.8 टन सोनं आहे. तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. ज्यांच्याकडे 2451.8 टन सोनं आहे, जे त्यांच्या एकूण मूल्याच्या 68.4 टक्के आहे. त्यांच्या एकूण परदेशी चलनाच्या मुद्रेचे भंडार 73 टक्के आहे.

तर फ्रान्स चौथ्या स्थानी आहे. त्यांच्याकडे एकूण 2,436 टन सोनं आहे. वर्ल्ड कौन्सिलच्या अहवालानुसार रशिया पाचव्या क्रमांकावर आहे. रशियाकडे 2241.9 टन सोनं आहे, ते परदेशी चलनाच्या 20.2 टक्के आहे.

सहाव्या क्रमांकावर आहे चीन, चीनकडे 1948.3 टन सोनं आहे, जे परदेशीच्या चलनाच्या 2.9 टक्के आहे. सातव्या स्थानी आहे स्विझर्लंड, त्यांच्याकडे 1,040 टन सोनं आहे. आठव्या स्थानी आहे जपान, जपानकडे 765.2 टन सोनं आहे, जे परदेशी चलनाच्या 2.8 टक्के आहे. तर भारत नव्या स्थानी आहे, भारताकडे 626 टन सोनं जमा आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like