बांग्लादेशात हिंदू पुजार्‍याची हत्या करणार्‍या दोषी JMB च्या 4 आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बांग्लादेशातील  बंदी घालण्यात आलेल्या इस्लामी दहशतवादी संघटनेच्या जमात उल मुजाहिद्दीन-बांग्लादेश (JMB) शी संबंधित चार जणांना जगनेश्वर रॉय हिंदू पुजारी  यांच्या हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

राजशाहीच्या फास्ट ट्रॅक न्यायाधिकरणाचे न्यायाधीश अनूप कुमार यांनी या चौघांनाही रेयर आणि रेरेस्ट असल्याच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली. एका वृत्तवाहिनीनुसार, या निर्णयाच्या वेळी जहांगीर हुसेन उर्फ रजीब, आलमगीर हुसेन आणि रमजान अली हे तीन दोषी न्यायालयात हजर होते. चौथा आरोपी रजीबुल इस्लाम या सुनावणीला उपस्थित नव्हता.

काय प्रकरण आहे?

50 वर्षांचे जगनेश्वर रॉय हे सोनापोटा गावच्या संत गौरियो मंदिराचे मुख्य महंत होते. 21 फेब्रुवारी 2016 रोजी काही लोकांनी त्यांची गळा कापून निर्घृणपणे हत्या केली. त्यांना धारदार शस्त्राने मारहाण देखील करण्यात आली होती. यावेळी त्यांचे शिष्य गोपाल चंद्र रॉय यांनाही गोळ्या घालण्यात आल्या.