थंड पाण्याने चेहरा धुणे त्वचेसाठी चांगले आहे का ? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – झोपेतून उठल्यानंतर चेहऱ्यावर हलकी सूज येते. इतकेच नव्हे तर कधीकधी चेहऱ्यावर लहान मुरुमही उद्भवतात. तणाव, झोपेतील अडथळा आणि काहीवेळा अन्नाची एलर्जी यामुळे सुद्धा चेहऱ्यावर लहान मुरुम येऊ शकते. सकाळी थंड पाणी चेहर्‍यावर शिंपडल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळते. चला तर मग जाणून घेऊया थंड पाण्याने चेहरा धुण्याचे काय फायदे.

जसे चेहऱ्यावर बर्फाचा गोळा चोळणे खूप फायदेशीर मानले जाते, त्याचप्रमाणे थंड पाण्याने चेहरा धुणे देखील एक चांगली टिप्स मानली जाते. या दोन्ही गोष्टींमुळे त्वचा तरुण होते. थंड पाण्याने चेहरा धुण्यामुळे बारीक रेषा आणि चेहर्यावरील सुरकुत्या कमी होतात.

चेहऱ्यावर येते चमक
थंड पाण्याने चेहरा धुण्याने त्वचा पूर्णपणे ताजी होते. थोड्या थंड पाण्यामुळे तुमची त्वचा पुन्हा टवटवीत होईल आणि तुम्हाला अधिक ऊर्जावान वाटेल. थंड पाण्यामुळे रक्त परिसंचरण तीव्र होते, ज्यामुळे चेहऱ्यावर चमकत येते.

थंड पाण्याने चेहरा धुण्यामुळे चेहऱ्यावरील छिद्रे बंद होतात. कोमट पाण्याने आपला चेहरा धुल्यानंतर, त्या छिद्रांना बंद करण्यासाठी त्यावर थंड पाणी शिंपडा. डोळ्यात थंड पाणी शिंपडल्यामुळे त्वचा देखील थंड होते.

त्वचेला येतो घट्टपणा
थंड पाणी सूर्य किरणांचे हानिकारक परिणाम दूर करते. थंड पाण्याने चेहरा धुण्याने त्वचेला घट्टपणा निर्माण होतो. तसेच उन्हात चेहऱ्यावरील मुरुमांचे छिद्र बंद राहतात.