मजूरांना घेऊन जाणार्‍या ST बसची डंपरला धडक ; 4 जण ठार तर 15 जखमी, बस सोलापूरहून जात होती झारखंडला

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – झारखंडला मजूरांना घेऊन जाणार्‍या एस टी बसला भीषण अपघात झाला आहे. रस्त्याचे काम करणार्‍या डंपरला एस टीने पाठीमागून धडक दिली. ही अपघातात ४ जण जागीच ठार झाले असून १५ जण जखमी झाले आहेत.

हा अपघात यवतमाळ जिल्ह्यातील आरणी तालुक्यातील कोळवण गावाजवळ पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला.  सोलापूरहून ही बस मजूरांना घेऊन झारखंडला जात होती. नागपूर -बोरी – तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होते. त्यासाठी काम करणारे डंपर रस्त्याच्या कडेला थांबले होते. एस टी चालकाचा डोळा लागला आणि त्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या डंपरला पाठीमागून जोरात धडक दिली.

त्यात एस टी बसचा पुढचा भाग मोठ्या प्रमाणावर चेपला गेला आहे. अपघातात चार जण जागीच ठार झाले. १५ जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.