राज्यातील ४२ हजार कैदी राहणार मतदानांपासून वंचित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील ४४ कारागृहात असलेल्या सुमारे ४२ हजार कैद्यांना कोणत्याही निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार नाही. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यापासून वंचित राहणार आहेत.
भारतीय राज्य घटनेच्या कलम १५१ नुसार कारागृहात असलेल्या गुन्हेगारांचा मतदानाचा हक्क गोठविण्यात आला आहे. त्यामुळे कारागृहात असलेल्या कोणालाही मतदान करता येत नाही.

राज्यातील ९ मध्यवर्ती आणि ३५ जिल्ह्यातील उपकारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांखाली सुमारे ४२ हजार कैदी आहेत. या कारागृहात शिक्षा झालेले दोन ते साडेतीन हजार कैदी तर ३५ उपकारागृहामध्ये प्रत्येकी २०० ते ४०० कैदी शिक्षा भोगत आहे. याशिवाय न्यायालयीन कोठडीत असलेल्या गुन्हेगारांची संख्या मोठी आहे.

त्यांना मतदानासाठी ते रहात असलेल्या ठिकाणी नेणे व त्यासाठी बंदोबस्त पुरविणे अशक्य आहे. त्याशिवाय ते कारागृहात असल्याने त्यांचा राज्य घटनेनुसार मतदानाचा हक्क गोठवला असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही. त्यामुळे सुमारे ४२ हजार कैद्यांचे मतदान होऊ शकणार नाही.