Coronavirus : राज्यात 24 तासात 431 नवे रूग्ण तर 18 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात एकूण 5649 ‘कोरोना’बाधित

Advt.

मुंबई : वृत्तसंस्था – राज्यात गेल्या 24 तासात 431 नवीन रूग्ण आढळून आले असून 18 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 5649 वर जाऊन पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाचे 269 बळी गेले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत जात असल्याचे राज्यातील सर्वांच्याच चिंतेत वाढ होत आहे.

गेल्या 24 तासात झालेल्या 18 मृत्यूपैकी 10 मृत्यू हे मुंबईत झाले आहेत. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यात 789 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या लक्षणीय आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबई आणि पुण्यात लॉकडाऊन दरम्यान दिलेली सूट काल रद्द करण्यात आल्याची घोषणा केली होती. गेल्या 24 तासात 67 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.