’या’ 5 पदार्थांच्या सेवनानं ‘फुफ्फुसं’ राहतील आजारांपासून दूर, जाणून घ्या कोणते पदार्थ

कोरोना काळात रोगप्रतिकारशक्ती आणि फुफ्फुसांचे आरोग्य राखणे खुपच महत्वाचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. फुफ्फुसं निरोगी असल्यास वाढत्या वयातही व्यक्ती निरोगी राहू शकते. श्वसनप्रणालीत फुफ्फुसं ही केंद्र आहेत. फुफ्फुसांची समस्या काहीवेळा जीवघेणी सुद्धा ठरूशकते. यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. काही घरगुती उपाय करून तुम्ही फुफ्फुसं निरोगी ठेवू शकता, जाणून घेवूयात ते उपाय…

हे आजार होऊ शकतात
1 क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिसीज
2 क्रॉनिक ब्रोंकायटिस
3 निमोनिया
4 अस्थमा
5 टीबी
6 लंग्ज कॅन्सरसह इतर अनेक आजार

करा हे उपाय

1 आलं
तुळशीची पानं, किसलेले आले, जेष्ठमध, भाजून कुटलेली अळशी (जवस) चहाच्या पातीचे तुकडे, घालून पाणी अर्धे आटेपर्यंत उकळवा. यामध्ये गुळ घालून, काढा गाळून प्या. छातीत कफ असल्यास लोखंडाच्या पळीत टाकणखार गरम करावा व ती लाही पिण्यापूर्वी मिसळावी. फुफ्फसांमध्ये असलेली घाण बाहेर फेकण्यासाठी हा काढा लाभदायक आहे.

2 आळशी
कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी आळशीचं बी अत्यंत उपयुक्त आहे. प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि फुफ्फुसांचा कॅन्सरशी लढण्यासाठी आळशीचं बी महत्त्वाचं आहे. आळशीच्या बियांमध्ये लिगननचा स्तर अधिक प्रमाणात असतो.

3 सफरचंद
सफरचंदाचे सेवन केल्याने शरीरास पोषक असलेली सर्वच तत्त्वं मिळतात. निरोगी आरोग्यासाठी दररोज सकाळी एक सफरचंद खा.

4 पनीर
यातील ओमेगा थ्री फॅटी एसिड्समुळे फुप्फुसांचे आरोग्य चांगले राहते. दूध, पनीर, दही, आळशीच्या बीया पोषक आहेत.

5 लसूण, कांदा
लसूण आणि कांद्याच्या सेवनाने फुफ्फुसांना मजबूती येते. यातील एँटीऑक्सीडेंट्स आणि एँटीफंगल गुणामुळे फुफ्फुसांमध्ये धुळीचे कण, किटाणू जमा होत नाहीत. फुफ्फुसं सुरक्षित राहतात.