५ लाख रुपये लुटण्याचा बनाव उघडकीस, दुकानदारासह २ साथीदार ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शेजारच्या दुकानदाराने पुण्यातील व्यापाऱ्यांना देण्यासाठी दिलेल्या पाच लाख रुपयांचा मोह पडल्याने दुकानदाराने आपल्या दोन साथीदारांसह आपल्याला लुटल्याचा बनाव रचला होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला असून दुकानदार व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडून ५ लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत.

खेड शिवापूर येथील व्यापाऱ्याचे पैसे देण्यासाठी आलेल्या दुकानदाराच्या कामगाराला तिघा जणांनी अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्याकडील ५ लाख रुपये लुबाडून नेले. ही घटना कात्रज येथील उड्डाण पुलाखालील सेवा रस्त्यावर रविवारी रात्री ८ वाजता घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, खेड शिवापूर येथे कल्याणसिंह राजपुरोहित याचे मिठाईचे दुकान आहे कल्याणसिंह कामानिमित्ताने पुण्याला निघाला होता. त्याच्या शेजारी असलेल्या किरणा माल दुकानदार रमेश चौधरी यांनी कल्याणसिंह ला दोन व्यापाऱ्याला देण्यासाठी रक्कम दिली. कल्याणसिंह याने नवले ब्रीज येथे कोथरूडच्या व्यापाऱ्याचे अडीच लाख रुपये दिले. त्यानंतर कोंढव्याचे व्यापारी प्रकाश पाटील यांना ५ लाख रुपये देण्यासाठी जात असताना कात्रज चौकातील उड्डाणपूलाखालील सेवा रस्त्यावर ते आले असताना समोरुन दोन दुचाकीवरुन तिघे जण आले. त्यांनी कल्याणसिंह यांच्या डोळ्यात मिरची पुड टाकून त्याच्यांकडील ५ लाख रुपये लुटून ते चोरटे कात्रज कोंढवा रोडला पळून गेले.

कल्याणसिंह यांनी याची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. कल्याणसिंह याच्या बोलण्यात काही विसंगती दिसत होती. तसेच त्याच्या डोळ्यात मिरची पुड टाकल्याचे तो सांगत असला तरी त्याचे डोळे लाल झालेले दिसत नव्हते. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्याची चौकशी केल्यावर त्याने हा बनाव रचल्याची कबुली दिली.

रक्तचाचणी द्वारे कळू शकते आयुर्मान आणि भविष्यातील आजार

या पाच गोष्टींचा ‘आहारा’ त करा वापर, शरीर होईल निरोगी

पश्चिम उपनगरातील रेल्वे प्रवाशांसाठी आता ‘रेल्वे आरोग्य कार्ड’

‘वजन’ कमी करताना घाई करू नका, हळूहळू करा कमी

 ‘हे’ नैसर्गिक उपाय केल्यास घेता येईल गाढ झोप