Coronavirus : केरळमध्ये एकाच कुटूंबातील 5 जणांना ‘कोरोना’ची लागण, भारतात एकूण 39 +ve केसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमधील एकाच परिवारातील ५ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या ३९वर पोहचली आहे.
याबाबत केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसचे ५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

त्यातील तीन जण नुकतेच इटलीहून परतले होते. त्यांच्याशी संपर्कात आल्याने मठाणमथिट्टा जिल्ह्यातील आणखी दोन जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता परदेशातून आलेल्या लोकांकडून भारतात या विषाणुचा फैलाव होण्याची शक्यता वाढू लागली आहे.

वुहान विद्यापीठातून परत आलेल्या एका केरळमधील विद्यार्थ्यांला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पहिली केस ३० जानेवारी रोजी केरळमध्येच आढळून आली होती. आता त्याच केरळमध्ये तिघांकडून अन्य दोघांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे समोर आले आहे.