लँड रोव्हरमध्ये सापडली ५० लाखाची रोकड   

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन- मुंबई येथील ताडदेव सर्कल भागात निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ५० लाखांची रोकड जप्त केली आहे. ताडदेव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

मुंबई ताडदेव सर्कल भागात शनिवारी रात्रीच्या सुमारास लाल रंगाची लँड रोव्हर (डिस्कवरी) (एमएच ०१ सीएच ०७०७) कारची तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाला या कारमध्ये ५० लाख रुपयांची रोकड आढळून आली. या कारमधील प्रशांत रमेशचंद्र समदाना याच्याकडे ही रोकड आढळून आली.

याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले असुन आयकर विभागाचे उप आयुक्त अधिक चौकशी करीत आहेत. अशी माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.