गुजरातमध्ये ऑक्सिजन प्लान्टमध्ये झालेल्या ‘शक्तीशाली’ स्फोटात 6 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बडोदा येथील ऑक्सिजन प्लान्टमध्ये भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर या घटनेत जखमींची संख्या देखील जास्त असल्याचे सांगितले जात आहे. जखमींंना उपचारासाठी तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बडोद्यातील AIMS इन्स्टिट्युट प्रा. लि येथे शनिवारी (11 जानेवारी) ही स्फोटाची घटना घडली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. स्फोटाचे कारण अद्याप समोर आले नाही.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/