तब्बल ३६ घोटाळेबाज देशातून पळाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात घोटाळे करून परदेशात पळून गेलेल्या मोजक्या उद्योगपतींची नावे आणि संख्या आपल्याला माहित आहे. परंतु देशात घोटाळे करून तब्बल ३६ घोटाळेबाज उद्योगपतींनी भारताबाहेर पलायन केले आहे. याबाबतची माहिती खुद्द सक्त वसूली संचलनालया (ईडी) ने सर्वोच्च न्यायालयात दिली. ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदीतील कथित घोटाळ्याच्या सुनावणीदरम्यान ईडीने ही माहिती दिली.

हेलिकॉप्टर खरेदीतील कथित घोटाळ्यातील आरोपी सुरेश मोहन गुप्ता याला अटक करण्यात आली असून त्याच्या जामीनाला विरोध करण्यात ला त्यावेळी ईडीने न्यायालयात हे निदर्शनास आणून दिले.

गुप्ता याला हेलिकॉप्टर खऱेदीतील घोटाळ्यातील संशयावरून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर मनी लॉंडरिंग कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे. विशेष न्यायालयाने त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. आपली मुळे समाजात घट्ट रुजली असून आपण देशाबाहेर पळून जाणार नाही. अशी हमी त्याने दिली होती.

त्यावेळी ईडीच्या वकीलांनी त्याला विरोध केला. तसेच विजय मुल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, मेहूल चोक्सी, संदेसरा बंधू यांची मुळेही देशात घट्ट रुजलेली होती. परंतु त्यांनी देशाबाहेर पलायन केले. गेल्या काही वर्षात देशातून अशा प्रकारे ३६ उद्योगपतींनी पलायन केले आहे. अशी माहिती ईडीच्या वकीलांनी न्यायालयात दिली.