‘पॉर्न’ पाहिल्यानंतर तरुणानं नशेत केलं ‘लज्जास्पद’ कृत्य, मित्राच्या 60 वर्षीय विधवा आईवर केला ‘बलात्कार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अलवर जिल्ह्यातील शाहजहांपूर पोलिस स्टेशन अंतर्गत पॉर्न व्हिडिओ पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका 21 वर्षीय तरुणाकडून त्याच्या मित्राच्या 60 वर्षीय विधवा आईवर बलात्कार केल्याची एक लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. आरोपीने प्रकरण दडपण्याच्या हेतूने बलात्कारानंतर पीडित वृद्ध महिलेची हत्या करण्याच्या उद्देशाने तिला जखमी केले आणि त्यानंतर महिलेला खोलीत बंद करुन पळ काढला.

रात्री वृद्ध महिलेचा आरडाओरडा ऐकून कुटुंबीय व ग्रामस्थांनी पीडितेस पाहिले, त्यानंतर पीडितेला शाहजहांपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी शाहजहांपूर येथे महिला डॉक्टर नसल्यामुळे बर्डोद हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केली आणि आरोपी विकासला अटक केली.

अहवालात असे सांगितले गेले होते की एका मित्राने आपल्याच मित्राच्या 60 वर्षाच्या विधवा आईला नशेच्या अवस्थेत आपल्या वासनेचे शिकार बनविले होते आणि ओळख लपवण्यासाठी आरोपीने विधवेला ठार मारण्याचा प्रयत्न देखील केला होता. महिलेच्या तोंडावर, हातावर आणि पायांवर गंभीर जखमांच्या खुणा आहेत.

रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. विधवेची ओरड ऐकून घटनास्थळी पोहोचलेल्या पीडिताच्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विकासला अटक केली आहे. पोलिस अधिकारी सुनील जांगिड म्हणाले की, रविवारी रात्री पॉर्न पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका व्यसनी तरुणाकडून आपल्या मित्राच्या आईवर बलात्कार करण्यात आला आणि महिलेवर अत्याचार करून जखमी केले गेले. दरम्यान आरोपी विकासला अटक करण्यात आली आहे.

You might also like