CM केजरीवाल मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ?, दिल्लीत 10 दिवसात 60 हजार ‘कोरोना’ रूग्ण

पोलिसनामा ऑनलाइन – सध्या दिल्लीत कोरोनामुळे भयावह परिस्थिती निमार्ण झाली आहे. दिल्लीत कोरोनाने उचांकी गाठली आहे. गेल्या दहा दिवसांत दिल्लीत ६० हजार कोरोना रुग्ण नव्याने दाखल झाले आहे. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात आहे याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाची रुग्ण संख्या पाहता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मोठा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधी दिल्लीमध्ये मिनी लॉकडाउन चर्चा झाली. परंतु, त्याहीपेक्षा कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत ‘आप’सरकार असल्याचं सध्या चर्चेत आहे.

दिल्लीत गेल्या चोवीस तासात तब्बल १३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोना आकडेवारीने नवा रेकॉर्ड केला आहे. गेल्या चोवीस तासात ७,४८६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. दिल्लीत आत्तापर्यंतच्या कोरोना रुग्ण संख्येने पाच लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी स्वतः जीटीबी रुग्णालयला भेट देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली. जीटीबी २३२ आयसीयू बेड वाढविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. याशिवाय दिल्लीतील धर्मशाळांमध्ये ६६३ वाढविण्यात येणार आहे. बाजारपेठा बंद करण्याविषयी बोलत असताना गरज असल्यास काही बाजारपेठा बंद करणार असंही ते म्हणाले.

दिल्लीतील नवे रेकॉर्ड

– गेल्या चोवीस तासांत १३१ जणांचा मृत्यू, आतापर्यंत सर्वाधिक आकडा
– याआधी १२ नोव्हेंबर रोजी १०४ जणांचा मृत्यू
– ९ नोव्हेंबर पासून १८ नोव्हेंबरपर्यंत एकूण ५९,५३२ नव्या रुग्णांची नोंद
– दिल्लीत आत्तापर्यंत साडेचार लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात

पाहू या आतापर्यंतची दिल्लीतील कोरोनाची आकडेवारी

– ७ हजार ९४३ – मृत्यू
– ४२, ४५८- ॲक्टिव्ह रुग्ण –
– ५ लाख ३ हजार ८४ एकूण कोरोना रुग्णांची संख्या
– गेल्या २४ तासात बरे झालेले रुग्ण ६,९०१
– दिल्लीतील कॅन्टोन्मेंट झोन ४४४४
गेल्या २४ तासांतझालेल्या एकूण चाचण्या ६२ हजार २३२
(आरटीपीसीआर-१९०८५, अँटीजेन- ४३,१४७)
– आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्या – ५५,९०,६५४