धक्‍कादायक ! ‘या’ देशाच्या राष्ट्रपतीने विकले थेट देशाच्या तिजोरीतीलच ७ टन सोने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण अमेरिकेतील वेनेजुएला हा देश सध्या मंदी, महागाईच्या परिस्थितीतून जात आहे. देशाची आर्थिक परिस्थिती खराब आहे, लोकांना खाण्यासाठी अन्न देखील मिळत नाही. मिडिया रिपोर्टच्या मते या देशात एक लीटर दूधाची किंमत 1 लाख रुपये आहे. तर 1 किलो मटण 3 लाख रुपयाचे आहे. याच वेनेजुएला सरकार बाबत आता एक मोठी बाब समोर येत आहे. एका रिपोर्ट मधून समोर आले की निकोलस मदुरो सरकारने कोणालाही थांगपत्ता लागू न देता आपल्याच देशातील सोन्याच्या भांडारातील सोने विकले आहे.

वेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी अमेरिकाचे प्रतिबंध असून देखील सोने पुर्व अफ्रिकेत पाठवण्यात आले आहे. वॉल स्ट्रीट जनरलच्या रिपोर्ट नुसार, वेनेजुएला आणि युगांडाच्या आधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, 2 विमाने 30 कोटी डॉलरपेक्षा जास्त किंमतीचे 7.4 टन सोने लपवून वेनेजुएला पासून युगांडाच्या एका रिफायनरीमध्ये पोहचवले आहे.

युगांडाच्या एक वरिष्ठ पोलीस आधिकाऱ्यांनी सांगितले की, पार्सलसंबंधित पेपर वर्क करताना गोल्ड असल्याचे समोर आले. तपासात स्पष्ट झाले की यातील काहींवर वेनेजुएला केंद्रीय बँकेची संपत्तीचे स्टॅम्प लावले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले की युगांडाच्या रिफायनरीमध्ये 2015 पासून ऑपरेशन सुरु झाले होते. यात येणारे अधिकतर सोने हे वित्त संकटात असलेल्या काँगो किंवा इतर आफ्रिकी देशाचे असते, किंवा स्मगलिंगचे.
AGR जनरल मॅनेजर चेरी एने डैकडैकने सांगितले की, AGR आतापर्यंत एकूण 38 टन सोने प्रोसेस केले आहे. वॉलस्ट्रीट जनरलच्या रिपोर्टनुसार, या रिफायनरीला युगांडाचे राष्ट्रपती युवेरी मुसेवेनीकडून मदत मिळते. मुसेवनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, राष्ट्रपती बाकी गुंतवणूक दारांप्रमाणे या प्लँन्टचे समर्थन करते. कारण ते युगांडाच्या अर्थव्यवस्थेत सुधार करु इच्छितात.

वॉशिंगटनने वेनेजुएलाचे विरोध पक्षाचे नेते जुआन गुएडो यांनी राष्ट्रपती म्हणून मान्यता दिली आहे. यासाठी वॉशिंगटनने मदुरो सरकारवर विविध प्रकारचे आर्थिक निर्बँध लादले आहेत. अमेरिकेने जगभरातील इतर देशांनी मदुरो सरकारसोबत कोणत्याही प्रकारचे आर्थिक संबंध ठेवण्यास बंदी घातली आहे. तरच मदत न करण्याची चेतावनी दिली आहे.

वेनेजुएला मध्ये दोन्ही नेत्यांमधील वाद समोर आला आहे. यूएस बरोबरच जवळपास 50 देश विरोधी पक्षी नेता गुएडो यांना समर्थन देत आहेत. तर देशातील काही नेते मदुरोचे समर्थन करतात.

आरोग्यविषयक वृत्त –

योग्य पद्धतीने बटाटा खा आणि वजन नियंत्रणात ठेवा

नैसर्गिक पद्धतीने करा हार्मोन्स बॅलन्स

अचानक येणारा हृदयविकाराचा झटका रोखता येऊ शकतो

कोणत्याही गोष्टीच टेंन्शन घेण्याअगोदर स्वतःचा विचार करा

You might also like