राज्यात सरकारी नोकरीची भरती ! ४६ वर्षांपर्यंच्या व्यक्तींनाही मिळेल ‘संधी’

मुंबई : पोसीसनामा ऑनलाइन – राज्यातील अकोला इथे शासकीय पदावर सध्या भरती सुरु आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाअंतर्गत ही भरती सुरु असून यात एकूण ७३ जागेवर भरती सुरु आहे. तसंच महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात ७०२ जागांवर भरती आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या भरतीच्या पदांमध्ये अकाउंटंट, क्लार्क, प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, प्रभाग समन्वयक, प्रशासन/लेखा सहाय्यक ही पदे आहेत. तर महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पात किसान मित्र या पदासाठी भरती होणार आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती प्रकल्पाअंतर्गत होणाऱ्या पदावरील उमेदवारांना जिल्हा अभियान कक्ष आणि तालुका अभियान कक्ष इथे काम करावे लागणार आहे. तर अकाउंटंट, क्लार्क, प्रशासन सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर यांना मराठी टायपिंग येणं आवश्यक आहे. या पदांसाठी वयाची अट ठेवली आहे. त्यानुसार २६ जुलै २०१९ रोजी १८ ते ३८ वर्षापर्यंत हवे, तर मागासवर्गीयांना यात ५ वर्ष सूट देण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ८ ऑगस्ट असून अर्ज करण्यासाठी http://akolamsrlm.padbharti.com या साईटचा वापर करावा. तसंच अर्ज करण्यासाठी फी असणार आहे. खुल्या वर्गासाठी ३७४ रु तर मागासवर्गीयांसाठी २७४ रुपये अशी आहे.

तर महाराष्ट्र शासनाच्या पथदर्शी प्रकल्पातील भरतीमध्ये सायन्स ग्रॅज्युएट्स विद्यार्थ्यांना/ उमेदवारांना काम करण्याची संधी मिळणार आहे. हे पद किसान मित्र असून या शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी काम करावे लागणार आहे. यात उमेदवारांनी नेमून दिलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी अत्याधुनिक तंत्राची माहिती देणं, तंत्रज्ञान प्रचार आणि प्रसारासाठी मल्टिमीडियाचा वापर करणं, गावातली कृषीविषयक पायाभूत साधन सुविधांची माहिती संकलीत करणं, प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकऱ्यांची गाथा संकलित करणं, ग्रामसभा घेणं अशी बरीच कामं या उमेदवारांना करावी लागणार आहेत. यासाठी उमेदवाराचे B.Sc (कृषी) किंवा B.Sc (उद्यानविद्या) शिक्षणाची पदवी असावी.

किसान मित्र पदासाठी अर्ज करण्यासाठी https://sarthi-maharashtragov.in/ या लिंकचा वापर करावा. तसंच ३० जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख देण्यात आली आहे. या पदासाठी विशेष म्हणजे उमेदवाराचे वय १ जुलै २०१९ रोजी २१ ते ४६ असावे पण ४६ वर्षानंतरच्या व्यक्तींनी अर्ज करू नये, असंही सांगण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like