RJ : 7th Pay Commission ! ‘कोरोना’ संकटात या कर्मचार्‍यांचे चमकले ‘नशीब’, सॅलरीत झाली ‘बंपर’ वाढ

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  7th Pay Commission : कोरोना संकट काळात राजस्थानमध्ये सहकारी बँकांचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या प्रोबेशन वेतनात दुपटीने वाढ करण्यात आली आहे. वेतनातील ही वाढ 1 जुलै 2020 पासून लागू करण्यात आली आहे. सहकार मंत्री उदयलाल आंजना यांनी ही माहिती दिली आहे. आंजना यांच्यानुसार, याचा बँकिंग सहायक, संवर्ग वरिष्ठ व्यवस्थापक तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांना थेट फायदा होईल.

प्रोबेशनच्या दरम्यान चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची सॅलरी प्रति महीना 4850 ने वाढवून 10600 रुपये करण्यात आली आहे. विशेष बाब ही आहे की, ज्या कर्मचार्‍यांचा प्रोबेशन पीरियड पूर्ण झालेला नाही, सरकारने त्यांनासुद्धा या कक्षेत ठेवले आहे. म्हणजे वेतनवाढीत त्यांच्यासुद्धा समान हक्क आहे. राजस्थान राज्य सहकारी बँक लिमिटेड आणि जिल्हा केंद्रीय सहकारी बँक लिमिटेडच्या कर्मचार्‍यांना हा लाभ मिळेल.

सहकार मंत्री उदयलाल आंजना यांनी संकटाच्या या काळात बेरोजगारांसाठी राजस्थानच्या सहकारी बँकांमध्ये लवकरच लोन सुपरवायझरच्या 300 पदांची भरती करण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारच्या या निर्देशानंतर सरकारी नोकरी हवी असणार्‍यांना चांगली संधी मिळणार आहे.

कोरोना महामारीने राज्यांच्या अर्थव्यवस्थेला प्रभावित केले आहे. आता राज्य सरकारचे कर्मचारी वेतनाबाबत चिंतेत आहेत. मात्र, लॉकडाऊन उघडल्यानंतर हळुहळु राज्यांचा महसुल वाढताना दिसत आहेत, जो मार्चनंतर प्रभावित झाला होता.