7 वा वेतन आयोग : सरकारी नोकरदारांना दुखापत झाल्यास मिळणार पगारी रजा, ‘या’ कारणांमुळं देखील मिळणार सुट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या आधारे केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांच्या रजा घेण्याच्या अनेक मानकांमध्ये बदल केले आहेत. यामुळे केंद्रीय कर्मचार्‍यांना सुट्टी मिळण्याची शक्यता वाढेल. यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना कर्मचारी व प्रशिक्षण मंत्रालयाने जारी केल्या आहेत.

दुखापत झाल्यास मिळणार पगारी रजा –

नवीन बदल झाल्यानंतर सर्व प्रकारच्या कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारे दुखापत झाल्यास किंवा इतर तात्पुरती जखम किंवा शारीरिक वेदना झाल्यास सर्व कर्मचार्‍यांना विशेष रजा मिळेल. पूर्वी या प्रकारची रजा केवळ शारीरिक अपंगांनाच उपलब्ध होती.

नवीन नियमानुसार जर एखाद्या कर्मच्याऱ्याला शरीराच्या भागाला दुखापत झाल्यामुळे किंवा त्रास झाल्यासमुळे तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असेल तर, तो जोपर्यंत हॉस्पिटलमध्ये आहे त्या सुट्टीच्या काळात त्याच्या पगारामध्ये कोणतीही कपात केली जाणार नाही. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर कर्मचार्‍यास पुढील 6 महिन्यांपर्यंत पूर्ण पगार आणि भत्ता मिळेल. यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निम्मा पगार दिला जाईल. या कालावधीत, इतर सुट्टीसाठी कोणतीही कपात केली जाणार नाही. या प्रकरणात, केंद्रीय सैन्य पोलिस दलातील कर्मचार्‍यांना 24 महिन्यांपर्यंत संपूर्ण वेतन मिळेल.

मुलांची देखभाल करण्यासाठी मिळणार रजा –

मुलांची देखभाल करण्यासाठी (CCL or Child Care Leave) सुट्टी घेऊन सरकारनेही मोठा बदल केला आहे. सरकारने या सुट्टीची मुदत वाढविली आहे. आत्तापर्यंत ही सुट्टी फक्त महिलांना देण्यात येत होती. 7 व्या वेतन आयोगाच्या महत्त्वपूर्ण शिफारशीत पुरुषांचा समावेश करण्यात आला आहे. चाईल्ड केअर रजा 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांच्या संगोपनासाठी 2 वर्षांची सुट्टी देते. या दरम्यान पगार देखील दिला जातो. ही सुट्टी वेगवेगळ्या काळात घेतली जाऊ शकते.

सरकारच्या म्हणण्यानुसार असे बरेच पुरुष कर्मचारी आहेत जे एकटेच आपल्या मुलांचे संगोपन करतात. म्हणून, अशा एकट्या पालकांना देखील या सुट्टीचा लाभ मिळावा. या सुट्टीअंतर्गत पहिल्या वर्षी रजा घेण्यासाठी 100 टक्के व दुसर्‍या वर्षी 80 टक्के पगार दिला जातो.

Visit – policenama.com