‘7 वा वेतन आयोग लगेच दिला, मग शेतकर्‍यांना हमीभाव का नाही’ (व्हिडीओ)

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मी शेतकऱ्याचं पोरगं असून शेतकऱ्यांसोबत राहणार. मी इकडचाही नाही अन् तिकडचाही नाही. आम्ही दिल्लीकरांपुढे शेपूट हलवत नाही, इथूनच दिल्लीवाल्यांना शेपूट हलवायला लवतो, असे म्हणत भाजप नेत्यावर आमदार बच्चू कडूंनी प्रहार केला. तसेच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देण्यात यावा, स्वामीनाथन आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी बच्चू कडूंनी विधानसभेतील भाषणात केली.

शेतकरी कर्जमुक्त होणारच नाही –

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीनं केवळ मलमपट्टी होणार आहे. पण, शस्त्रक्रिया करायची असेल तर भाव दिल्याशिवाय पर्याय नाही. आज जरी कर्जमाफी केली तरी शेतकरी कर्जमुक्त होऊ शकत नाही. उद्या त्यांच्या उताऱ्यावर कर्ज येणारच. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असे म्हणत बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचा मुद्दा लावून धरला. 7 व्या वेतन आयोगासाठी कुणाला मोर्चे किंवा आंदोलन करावे लागले का ? 7 वा वेतन आयोग आपण लगेच देऊन टाकला. शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही.

इथं लष्कराचं राज्य पाहिजे –

पीएम किसान योजना अद्याप लोकांपर्यंत पोहचलेली नाही. कारण, प्रशासन नालायक आहे. इथं लष्कराचं राज्य पाहिजे, तेव्हा अधिकारी सरळ होतील. आम्हीच शेतकऱ्यांचे लाड पुरवतोय. शेतकऱ्याची पाच लाखाची शेती गहाण ठेवून वीस हजार रुपये कर्ज दिलं जातयं. आता ठाकरे सरकार आहे, शेतकऱ्यांनी ठाकुरकी केली पाहिजे. हमीभाव दिला तर शेतकरी तुमच्याकडे कर्ज मागायला येणार नाही, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/