7 वा वेतन आयोग : मोदी सरकारकडून ‘या’ कर्मचारांना ‘गिफ्ट’, पगार वाढणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकार सणासुदीच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचाऱ्यांना खुशखबरी देणार आहेत. सरकारने नुकतीच सातव्या वेतन आयोगाची घोषणा केल्यानंतर आता सरकारी कॅंटीनमध्ये काम करणाऱ्या  कन्फेक्शनर्स आणि असिस्टंट कन्फेक्शनर्स यांच्या वेतनामध्ये वाढ केली जाणार आहे.

यापुढे या कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांची वाढ मिळणार असून 1 ऑक्टोबर 2019 पासून हि वेतनवाढ लागू केली जणार आहे. यासाठी सरकारने अधिसूचना देखील काढली आहे. मिळालेल्या माहितीनुसर, सरकारने  या आदेशात केंद्र सरकारच्या कॅंटीनमध्ये कार्यरत असणाऱ्या शेकडो असिस्टंट कूकच्या रिस्क एंड हार्डशिप अलाउंसमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आता दैनिक भत्यामध्ये देखील वाढ केली जाणार आहे. यासाठी कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडला जाणार आहे. मात्र सध्या हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका सुरु असल्याने यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांकडून हे भत्ते वाढवण्याची मागणी केली जात होती.

सरकारच्या मागील कालखंडात देखील मोदी सरकार यावर विचार करत होती, मात्र निर्णय झाला नव्हता. दरम्यान, सध्या सरकार यावर गांभीर्याने विचार करत असून दोन्ही राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Visit : Policenama.com