सांगलीत 8 लाखांचा चोरीचा मुद्देमाल दिला परत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली शहर, सांगली ग्रामीण, संजयनगर आणि ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या १० गुन्ह्यातील ८ लाख २२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल मुळ मालकांना परत देण्यात आला.

यामध्ये मोटार सायकल, सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल, कॅमेरा, रोख रक्कम याचा समावेश आहे.
पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक अशोक वीरकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या हस्ते हा मुद्देमाल परत देण्यात आला.

पोलिस मुख्यालयातील सभागृहात हा कार्यक्रम झाला. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हातील फिर्यादी मधकुर आवळे यांना सोन्या, चांदीचे दागिणे व रोख रक्कम असा एकूण २ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल परत दिला. संजयनगर पोलिस ठाणे हद्दीतील फिर्यादी मयुर जंगम यांचा ४० हजार रुपये किंमतीचा कॅमेरा, योगेश अशोक हुदर यांचा १५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल परत देण्यात आला.

सांगली शहर पोलिस ठाणे हद्दीतील फिर्यादी समीर शहा यांचे १ लाख ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्या, चांदीचे दागिने, अजय घाडगे यांचा ५५ हजार किंमतीचा, सचिन सगरे आणि अतुल यादव यांना २ लाख ५ हजार रुपये किंमतीचा मुद्देेमाल परत देण्यात आला. विश्रामबाग पोलिस ठाणेकडील श्रीशैल्य महाजन, वसुधा कुंभार आणि अरुण कणसे यांचे सोन्या चांदीचे दागिने आणि मोबाईल असा ३ लाख १८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल परत देण्यात आला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/