कौतुकास्पद ! ती स्वतः 8 महिन्याची ‘प्रेग्नंट’, ‘कोरोना’च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी ‘नर्स’ पोहचली 250 KM दूर

तामिळनाडू : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जगभरात अराजकता पसरली असून भारतातही याचा कहर दिसत आहे. डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाशी सामना करावा लागत आहे. हे सगळे आपला जीव धोक्यात घालून लोकांची मदत करत आहेत. या सगळ्यांची भूमिका कोणापासून लपून राहिलेली नाही. जे आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र लोकांची मदत करत आहेत.

अशीच एक घटना तामिळनाडूमधून समोर आली आहे, जिथे एक नर्स कोरोनाच्या रुग्णांची मदत करण्यासाठी २५० किमीचा प्रवास करून रुग्णालयात पोचली. विशेष असे की, ती आठ महिन्याची गरोदर आहे. पण तरीही ती रुग्णांची मदत करायला इतक्या दुरवरचे अंतर पार करून रुग्णालयात पोचली.

विनोथिनी नावाची ही नर्स आठ महिन्यांची गरोदर असून ती २५ वर्षांची आहे. कोरोना व्हायरसच्या या संकटात रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कोविड -१९ च्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी विनोथिनीने तिरुचिरा ते तमिळनाडूमधील रामनाथपुरम पर्यंत २५० किमी प्रवास केला.

माहितीनुसार, विनोथिनी तिरुचीच्या एका खासगी रुग्णालयात कार्यरत होती. १ एप्रिलला रामनाथपुरमच्या आरोग्य सेवा संचालक (जेडी) कडून एक फोन आला. त्यानंतर विनोथिनीने प्राथमिक आरोग्य रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने रुग्णालयात पोहोचण्यासाठी २५० किलोमीटरचा प्रवास केला.

डीवायएफआयचे जिल्हा सचिव पी.लेनिन, पर्यटनमंत्री वेल्लमंडी एन नटराजन आणि जिल्हाधिकारी एस.शिवरासू यांना त्यांच्याकडून पास मिळाला होता, त्यामुळे लॉकडाऊन असूनही तिला बाहेर जाण्याची आणि प्रवास करण्याची परवानगी मिळाली. यानंतर आठ महिन्यांची ही गर्भवती नर्स अखेर पतीसह कारने तिरुचिरा येथून रामनाथपुरमला पोहोचली.