‘कोरोना’मुळे 86 % भारतीयांना सतावतेय नोकरी जाण्याची चिंता, जाणून घ्या देशातील परिस्थिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे जगभरातील बहुतांश देशांनी लॉकडाऊन घोषित केले आहे. त्यामुळे सर्वच उद्योगधंदे ठप्प असल्याने याचा परिणाम त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. व्यवसाय-उद्योगामध्ये रोखीची कमतरता भासू लागली आहे. अशा परिस्थितीमध्ये लोकांचा पगारात कपात करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे सुमारे 86 टक्के लोकांना आपली नोकरी जाण्याची भीती सतावत आहे.

ब्रिटीश संशोधन संस्था क्रॉस्बी टेक्स्टर ग्रुपने केलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, कोविड -19 या साथीच्या रोगामुळे लोकांना आपली नोकरी आणि रोजीरोटी गमावण्याची चिंता सतावत आहे.

साथीचे रोग आणखी वाढेल
सर्वेक्षणात केलेल्या 84 टक्के लोकांना असे वाटते की साथीचा रोग अद्याप पहिल्या टप्प्यात आहे आणि आता तो वेगाने वाढत आहे. त्याच वेळी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामधील लोकांना असे वाटते की, साथीचा रोग वाढत आहे, तर हाँगकाँगमधील लोकांना वाटते की व्हायरस पहिल्यापासून नियंत्रणात आहे.
विशेष म्हणजे, सर्वेक्षण केलेल्या पैकी सर्वाधिक 86 टक्के भारतीय लोकांना त्यांची नोकरी जाण्याची भीती असून ते सध्या याच चिंतेत आहेत. या तुलनेत ब्रिटनमधील केवळ 31 टक्के, ऑस्ट्रेलिया मधील 33 टक्के, अमेरिकेतील 41 टक्के आणि हाँगकाँगमधील 71 टक्के लोकांना कोरोनामुळे आपली नोकरी जाण्याची चिंता वाटत आहे.

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारत, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँगमधील ब्रिटीश संशोधन संस्था क्रॉस्बी टेक्स्टर ग्रुपने 23 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान हे सर्वेक्षण केले आहे.

मोदी सरकारवर 84 टक्के लोक समाधानी
भारतात देखील सर्वेक्षण करण्यात आले असून भारतातील 84 टक्के लोक मोदी सरकारवर समाधानी आहेत. सरकार या साथीच्या रोगाचा ज्या प्रमाणे सामना करत आहे त्यानुसार सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 84 टक्के भारतीयांनी आपण समाधानी असल्याचे म्हटले आहे. याच तुलनेत अमेरिकेत 43 टक्के, ब्रिटनमध्ये 56 टक्के, हाँगकाँग 56 आणि ऑस्ट्रेलियातील 71 टक्के लोक सरकार कोरोनावर करत असलेल्या उपययोजनांवर समाधी आहेत.