९७ जणांनी केले ११७१ वेळा वाहतूक नियमांचे उल्लंघन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

वाहन चालकांना वाहतूकीची शिस्त लागावी यासाठी पुणे वाहतूक पोलिसांकडून अनेक उपाय योजना केल्या जातात. मात्र, बेशिस्त वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन सर्रास करण्यात येते. वाहतूक शाखेने तयार केलेल्या यादीमध्ये तब्बल ९७ जणांनी १ हजार १७१ वेळा वाहतुक नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी २ लाख ७१ हजार ३५० रुपयांचा दंड वसुल केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b094ce66-cefd-11e8-b74e-15eb21e460c5′]

पुणे शहरातील वाहतूक सुरळीत चालावी तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या मोहिमा राबवल्या जातात. वाहन चालकांना वाहतूकीची शिस्त लागावी यासाठी वाहतूक शाखेकडून ई-चलन मशिनद्वारे व सीसीटीव्हीद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. पुणे शहरात वारंवार वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांची यादी तयार करुन त्यांना समन्स बजावणी करुन पोलिसांना त्यांच्या घरी पाठवून दंडाची रक्कम वसुल केली.

[amazon_link asins=’B06XG9SDBN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b84ea70f-cefd-11e8-871a-4ba99449202e’]

पुणे वाहतुक पोलिसांनी २०० वाहनचालकांची यादी तयार केली होती. यामध्ये ९७ वाहनचालकांनी वारंवार वाहतुक नियमांचे उल्लंघन केले आहे. या वाहन चालकांच्या घरी वाहतूक पोलिसांना पाठवून त्यांना समन्स बजावणी करुन २ लाख ७१ हजार ३५० रुपयांचा दंड वसूल केला. उर्वरीत वाहन चाकांचा शोध घेऊन दंड वसूल करण्यात येणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

[amazon_link asins=’B01ISYR71E’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a9cee52-cefe-11e8-879b-ab03a8205371′]

ही कारवाई वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली  वाहतूक विभागांचे सर्व प्रभारी अधिकारी, पोलीस कर्मचारी करित आहेत. ही कारवाई अशीच पुढेही चालु राहणार आहे. तरी वाहन चालकांनी वाहतूकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोथरुड येथील कचरा डेपोला आग

बेशिस्त वाहनचालकांवर कितीही कारवाई केली तरी त्यांच्यात सुधारणा होत नाही. त्यामुळे वारंवार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी. तसेच विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर देखील कड कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.