अरे बापरे….पॉर्नच्या आहारी गेलेल्या १४ वर्षाच्या मुलाने १६ वर्षाच्या बहिणीवरच केला बलात्कार

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईन

पाॅर्न फिल्म पाहण्याच्या आहारी गेलेल्या एका 14 वर्षाच्या मुलाने आपल्याच 16 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत घडली आहे. मागील अनेक दिवसापासून हा मुलगा आपल्या बहिणीवर अत्याचार करत होता. सततच्या आत्याचारामुळे पीडीत मुलगी गर्भवती राहिल्यानंतर कुटुंबियांना समजल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

डीसीपी तुषार दोषी यांनी याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार मुलीच्या आईने हा गुन्हा समोर आणला व भावाला अटक करायला लावली. आरोपीला पॉर्न फिल्म पाहण्याची सवय लागली होती. त्यामुळे तो पाॅर्नच्या आहारी गेला होता. चार महिन्यांपूर्वी या मुलांचे आई-वडिल काही कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. घरी कोणी नव्हते. मुलाने याच संधीचा फायदा घेत आपल्या मोठ्या बहिणीवर सतत बलात्कार केला. ज्यावेळी पीडीत मुलीला आरोग्याच्या संदर्भात काही समस्या सुरू झाल्या तेव्हा मुलीची आई तिला रुग्णालयात घेऊन गेली होती. डाॅक्टरांनी तिच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या त्यामध्ये ती गर्भवती असल्याचे समोर आलं. हा प्रकार समजल्यानंतर कुटूंबीयांना धक्का बसला असून, मुलीचे समुपदेशन केल्यानंतर तिने सर्व घडलेला प्रकार सांगितला.

कामोठे पोलिसांनी एफआयआर नोंदवून सात जूनला आरोपीला अटक केली. पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही नात्याने भाऊ-बहिण असून कामोठे गावातील शाळेमध्ये जातात. दोघांचे आई-वडिल नोकरी करतात त्यामुळे कामानिमित्ताने ते बराचवेळ घराबाहेर असतात. आरोपी मुलाला पॉर्न पाहण्याची सवय लागली होती. घरात कोणी नसतात तो सतत पॉर्न पाहत बसायचा.