PUBG च्या नादात 16 वर्षाच्या मुलाने आजोबांच्या खात्यातून उडवले 2 लाख रुपये
मोहाली : वृत्तसंस्था – ऑनलाइन मोबाइल गेम पबजीबद्दल लोकांमध्ये एक वेगळीच आवड दिसते. विशेषत: तरूणांमध्ये एखाद्या व्यसनाप्रमाणे तिचा परिणाम झाला आहे आणि त्यावर बराच वेळ घालवतात. या गेममुळे पंजाबच्या मोहालीमध्ये एका मुलाने त्यावर २ लाख रुपये खर्च केले. मोहालीमधील या १६ वर्षाच्या मुलाने खेळाशी संबंधित वस्तू खरेदी करण्यासाठी हे पैसे उडवले, जेणेकरून त्यात अधिक चांगले प्रदर्शन करता येईल. मिळालेल्या माहितीनुसार, त्याने यासाठी आपल्या आजोबांचे पेन्शन खाते वापरले.
आजोबांच्या खात्यातून गुप्तपणे केले पेमेंट
एका वृत्तसंस्थेनुसार, या १६ वर्षांच्या मुलाने खेळातील वस्तू खरेदी करण्यासाठी अननोन कॅश व क्रेडिट खरेदी केले. या रकमेतून इन-ऍप खरेदीद्वारे गेममध्ये वापरल्या जाणार्या बर्याच प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या.
अहवालानुसार, शाळेतल्या एका मोठ्या मुलानेच या मुलाला या गोष्टींबद्दल सांगितले होते, जेणेकरून तो आपल्या आजोबांच्या खात्याचा वापर करू शकेल आणि कोणालाही कळणार नाही.
अहवालानुसार, त्याने २ महिन्यांत ३० वेळा पेमेंट केले, ज्यामध्ये ५५ हजार रुपये खर्च झाले. यानंतर त्याने आजोबांच्या नावाने तयार केलेल्या पेटीएम खात्याद्वारे काही यूसी क्रेडिट्स देखील खरेदी केले.
अकाउंट स्टेटमेंटमुळे झाला खुलासा, तक्रार दाखल
नियमित तपासणीसाठी त्या खात्याचे स्टेटमेंट पाहिले, तेव्हा कुटुंबाला याबद्दल माहिती झाले. कडक चौकशी केली असता मुलाने सांगितले की, त्याने पबजी गेममध्ये २ लाखाहून अधिक खर्च केला आहे. या कामासाठी त्याने आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्यालाही काही पैसे दिल्याचे त्याने सांगितले.
यानंतर कुटुंबीयांनी ज्येष्ठ मुलाविरूद्ध मोहाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्याच मुलाने आपल्या मुलाला फसवणुकीच्या दिशेने ढकलले असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे.
पंजाबमधून सलग दुसरे प्रकरण
मात्र हे काही पहिले प्रकरण नाही. गेल्या आठवड्यातही पंजाबमध्येच १७ वर्षीय एका मुलाने या गेममध्ये १६ लाख रुपये उडवून दिल्याची घटना समोर आली होती. मुलाने कुटुंबाच्या वैद्यकीय खर्चासाठी ठेवलेली रक्कम खर्च केली होती.