दूध दरवाढ आंदोलन : राधाकृष्ण विखे पाटलांवर गुन्हा दाखल तर इतर 17 जणांवर कारवाई

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपने आज राज्यात दूध दरवाढ मिळावी यासाठी आंदोलन केले. राज्यातील भाजप नेत्यांनी आंदोलन केले. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दूध दरवाढीसाठी राहता येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी जमाबंदीचा भंग केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह 17 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी आजपासून राज्यभरात भाजप नेत्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. राहता येथे असेच आंदोलन करण्यात आले.

मात्र, यावेळी नगर मनमाड महामार्गावर रस्तारोकोही करण्यात आला. जमावबंदीचा भंग केल्या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शिर्डीमध्ये भाजप जिल्हाध्यक्षासह माजी आमदारावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दूध दरवाढीसाठी नेवासा येथे रास्तारोको करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर यांच्यासह 35 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना रास्तारोको, जमावबंदीचा भंग यासह विविध कलमान्वये नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like