‘ट्रिव्हॅगो ट्रिप्स’ कंपनीच्या व्यवस्थापकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

इंदोर येथील हॉटेलमध्ये राहण्यासाठी बुकिंग करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या ‘ट्रिव्हॅगो ट्रिप्स’ कंपनीच्या व्यवस्थापक व बुकींग व्यवस्थापकावर अलंकार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ऑगस्ट २०१८ मध्ये घडला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5962ed77-cc77-11e8-b2d1-832720fb2db0′]
राजेंद्र जोग (वय-५० रा. एरंडवणे, पुणे) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी ‘ट्रिव्हॅगो ट्रिप्स’ या कंपनीच्या व्यवस्थापक आणि बुकींग व्यवस्थापकाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र जोग यांनी ३० ऑगस्ट रोजी ‘ट्रिव्हॅगो ट्रिप्स’ या कंपनीच्या व्यवस्थापक आणि बुकींग व्यवस्थाकासोबत बोलणी केली. इंदोर येथील हॉटेल लेमन ट्री या ठिकाणी राहण्यासाठी जोग यांनी ‘ट्रिव्हॅगो ट्रिप्स’ कंपनीमार्फत बुकींग केले होते. त्यासाठी त्यांनी कंपनीला पेटीएमद्वारे ५५ हजार ४९९ रुपये दिले होते. जोग हे इंदोर येथे गेले असता हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली नाही. त्यामुळे जोग यांनी कंपनीच्या व्यवस्थापक आणी बुकींग व्यवस्थापकाकडे पैशांची मागणी केली. मात्र, पैसे परत न करता ‘ट्रिव्हॅगो ट्रिप्स’ या कंपनीने त्यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ए.डी. घोडके करीत आहेत.

[amazon_link asins=’B07CL6Q16D,B074NW2Q3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’669dc4d0-cc77-11e8-b71b-7fab6b15d0c4′]
सहलीचे पॅकेज देण्याच्या बहाण्याने फसवणूक
पुणे : काश्मिर येथे फिरायला जाण्यासाठी आणि त्या ठिकाणी राहण्याची सोय करुन देण्याचे पॅकेज देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीची १ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार जुलै २०१८ मध्ये स्वारगेटजवळ घडला. याप्रकरणी एका पुरुषासह महिलेविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश कुलकर्णी (वय-५० रा. मुद्रे बुद्रुक, ता. कर्जत, जि. रायगड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रमेश कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीला काश्मीरमध्ये फिरायला जायचे होते. आरोपींनी त्यांना जाण्या येण्याच्या प्रवासाच्या तिकीटासह तेथे राण्याच्या खर्चाचे पॅकेज दिले होते. त्यासाठी आरोपींनी त्यांच्याकडून १ लाख २५ हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही कुलकर्णी दांपत्यास काश्मिरला न पाठवता त्यांची आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास स्वारगेट पोलीस करित आहेत.